उदगीर च्या नवीन बस स्थानका ची निविदा मंजूर, लवकरच कार्यारंभ – आ. संजय बनसोडे

उदगीर च्या नवीन बस स्थानका ची निविदा मंजूर, लवकरच कार्यारंभ - आ. संजय बनसोडे

उदगीर (एल पी उगीले) : उदगीर येथील बस स्थानक जवळपास 52 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. सद्यस्थितीत या बसस्थानकाची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून मोठा पाऊस झाल्यास चक्क कळायला लागते. तसेच काही ठिकाणी गिलावाही गळून पडला आहे. त्यामुळे अत्यंत धोकादायक बनलेल्या या इमारतीला दुरुस्ती करावी, म्हणून मागणी होत होती. मात्र उदगीरचे कार्यसम्राट आ. संजय बनसोडे यांनी बसस्थानकाची नवीन इमारत निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रक्रिया सुरू करून निविदा काढली.
चार कोटी 69 लाख 8 हजार रुपये चा निधी सदरील नवीन इमारतीसाठी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा ही मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी दिली आहे.
पूर्वीही माजी आ. सुधाकर भालेराव यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता, मात्र केवळ आश्वासनावर आश्वासने असे सत्र चालू राहिले. अखेर महाविकास आघाडीच्या काळात सदरील कामाचे मुहूर्त लागले. आणि निविदा मंजूर झाली. यासंदर्भात अनेक अडथळे आणण्याचेही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. तसेच कित्येक विकास कामे थांबवण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचे जनतेच्या निदर्शनास येत आहे. असे असताना देखील या अडथळ्याच्या शर्यतीतून उदगीरच्या बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्यात आ. संजय बनसोडे हे यशस्वी झाले आहेत.
उदगीर येथील बस स्थानक नवीन इमारत करण्यासाठी 2018 साली नऊ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक देऊन बसस्थानकाचे डिझाईन तयार करण्यात आले होते. प्रस्तावांमध्ये अद्यावत दोन मजली बस स्थानक इमारत होती. त्यात अठरा प्लॅटफॉर्म, प्रवासासाठी प्रशस्त प्रतीक्षालय, प्रवाशांना बसण्याची सुविधा, अत्याधुनिक शौचालय व स्वच्छतागृह, मध्यवर्ती औषधी दुकान, पोलीस चौकी, चालक व वाहक यांच्यासाठी प्रतीक्षालय, महिला वाहकासाठी स्वतंत्र प्रतीक्षालय, अपंगासाठी स्वतंत्र शौचालय ,विविध वस्तूंची दुकाने, बुक स्टॉल, दुचाकी व चार चाकी वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था आणि बसस्थानकाच्या दर्शनी भागात सुंदर असा बगीचा, असा प्रस्ताव निर्माण करण्यात आला होता.
प्रत्यक्षात बस स्थानकाच्या कामाची किंमत कमी करून त्या काळात चार कोटी 45 लाख 28 हजार पन्नास रुपयांच्या निधीस मंजुरी दिली होती, एका कंत्राटदाराने ही निविदा घेतली होती, परंतु तीन वर्षापासून सदर कंत्राटदाराने बसस्थानकाचे काम सुरू केले नाही. हे लक्षात आल्यानंतर विद्यमान आमदार संजय बनसोडे यांनी पुन्हा पाठपुरावा करून ती निविदा रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया काढण्यात आली. आणि आता ती मंजूरही करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर नवीन इमारत जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध होईल. अशी अपेक्षाही आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.

चौकट……
श्रेयासाठी नाही जनकल्याणासाठीच माझे काम आ. संजय बनसोडे

उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आपल्याला खूप प्रेम दिले असून त्या प्रेमाची पावती म्हणून जनतेच्या सूचना आणि त्यांच्या गरजा विचारात घेऊन विकास कामांना गती देत असल्याची माहिती ही आमदार बनसोडे यांनी दिली आहे मी काम करत असताना माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य माणसांचा फायदा कसा होईल हेच डोळ्यासमोर ठेवत असतो या कामाचे श्रेय मला मिळेल किंवा नाही याची मी मात्र तमा ठेवत नाही फक्त काम करून जनसेवा करायची लोककल्याणकारी योजना मतदारसंघात आणायच्या हाच आपला उद्देश असल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले

चौकट……..

भीक नको कुत्रा आवर

उदगीर विधानसभा मतदारसंघात विकास कामांना गती मिळत असतानाच दुर्दैवाने सत्ता परिवर्तन झाल्यानंतर काही कामांना स्थगिती देण्यात आली, आणि विकास कामांना खीळ बसली, अशाही परिस्थितीत आ.बनसोडे विकासाचा गाडा पुढे हाकत असताना, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन विकास कामे थांबवण्याचा आग्रह धरला आहे. हा प्रकार म्हणजे “भीक नको, कुत्रा आवर” म्हणण्यासारखेच आहे. उदगीर बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा दगड त्यांच्याच हस्ते पाच आगस्ट 2019 रोजी लावला गेला होता, मात्र त्यानंतर या विषयाकडे भारतीय जनता पार्टीचे कोणीही डुंकूनही पाहिले नाही. आता विकास होतो आहे, तर तो होऊ द्या. अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी जनसामान्यांची भावना होऊ लागली आहे.

About The Author

error: Content is protected !!