डॉक्टर राजेश दरडे यांचा राज्यपालाच्या हस्ते गौरव

डॉक्टर राजेश दरडे यांचा राज्यपालाच्या हस्ते गौरव

उदगीर (एल. पी.उगीले) : लातूर येथील ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ डॉ. दरडे यांनी आज तागायत केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन, त्यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट स्त्री रोग तज्ञ म्हणून सन्मानित करण्यात आले. राजभवनामध्ये त्यांना पुरस्कार देऊन त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डी वाय पाटील यांचे ए एम ओ जी एस कौतुक प्रमाणपत्र देखील याप्रसंगी देण्यात आले. या कौतुक सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर राजेश दरडे हे उदगीर येथील उद्योगपती महेश एरनाळे यांचे साडू असून त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल आणि गौरव बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!