श्यामार्य कन्या विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

श्यामार्य कन्या विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त श्यामार्य कन्या विद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तृप्ती ज्ञाते उपस्थित होत्या. तसेच मराठी विषय विभाग प्रमुख श्रीमती संगीता खादीवाले ,सतनप्पा हुरदळे उपस्थित होते.
प्रेरणादायी पुस्तके वाचन खरोखरच आपले जीवन बदलू शकते. चरित्रे वाचणे आपल्याला कठोर परिश्रम करण्यास आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी समर्पित राहण्यास देखील प्रोत्साहित करू शकतात. हे आपल्याला जीवनात एक चांगले व्यक्ती बनण्यास मदत करते.वाचनाची सवय लावण्याचे अनेक फायदे आहेत.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तकांचे वाचन या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये केले जाते. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दूरदृष्टी, शक्तीशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील, या दृष्टीकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाते.असे अध्यक्षिय समारोपातून श्यामार्य कन्या विद्यालाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी निडवंचे यांनी तर आभार सतनप्पा हुरदळे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!