केंद्र सरकारचा कृषी कायदा शेतकरी हिताचा – चेतनाताई गाला
लातूर (प्रतिनिधी) : केंद्राने मंजूर केलेला कृषी कायदा शेतकरी हिताचा आहे. अशी चर्चा भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली असता. त्याला सम्मती देवून चेतना गाला यांनी हा कायदा शेतकरी बांधवाला मदत करणारा आहे. त्यामुळे या कायद्याची केंद्र शासनाने अंमलबजावनी करावी. असे प्रतिपादन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उपाध्यक्षा चेतनाताई गाला यांनी केलेे.
यावेळी त्या मजगे नगर भागातील कैलास निवासस्थानी आयोजित सत्कार समारंभात बोलत होत्या.
प्रारंभी सौ.आदितीताई अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, मानदेशी बँकेच्या कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, मानदेशी फाऊंडेशनच्या लातूरच्या समन्व्यक देविका शिवपुजे, महाराष्ट्र नागरी बँकेचे कार्यकारी संचालक अमरदिप जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मानदेशी महिला ग्रामसहकारी बँक या ग्रामीण स्त्रिंयासाठी चालविलेल्या पहिल्या बँकेच्या संस्थापक अध्यक्षा चेतनाताई गाला यांनी बँकींग क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. त्यांना त्यांच्या या कामाबद्दल अशोका फेलोशिप, एल.युनिर्व्हसिटीची फेलोशिप देवून अनेक संस्थानी सन्मानित केलेल्या आहेत. ग्रामीण भागातील व दुष्काळग्रस्त महिलांसाठी त्यांनी काम केलेले आहे. तसेच नवीन उद्योजगकांसाठी प्रशिक्षण देवून तरूणांना उद्योजक बनविण्याचे कामही त्यांनी केले. याबरोबरच महाराष्ट्रातील मानदेश भागातील स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी काम केले असल्यामुळे त्यांचा देशातील व परदेशातील नावलौकीक मिळवणार्या समाजसेविका म्हणून उल्लेख केला जातो, त्यांच्या कामाची दखल घेवून लातूरात कव्हेकरांच्या कैलास निवासस्थानी सौ.आदितीताई आजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचा एम.एन.एस.बँकेचा प्रयत्न
यावेळी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी चेतनाताई गाला यांच्यासोबत महिला सक्षमीरणासंदर्भात चर्चा करताना एम.एन.एस.बँकेचे जो धाडसी निर्णय घेवून 10 हजार महिलांना कर्ज देवून स्वावलंबी करण्याचा संकल्प केल्याची माहिती दिली. त्यापैकी 3 हजार महिलांना प्रत्यक्ष कर्ज वाटप केले. तसेच आत्महत्याग्रस्त 125 कुटुंबियांना आर्थिक मदत देवून आधार देण्याचे काम केले. तसेच काही काम केले. आणि या सामाजिक उपक्रमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती दिली.