पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील मटन विक्रेते गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून चिकण विक्री करुन पन्नास ते साठ कुटूंबाचा उदरनिर्वाह भागत आहे. मात्र या कुटूंबाचा विचार न करता काही लोकांच्या सांगण्यावरून कारवाई करत चिकन विक्रेत्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
        खाजगी व मालकीच्या जागेमध्ये अनेक जण मटन विक्रीचा व्यवसाय करुन उपजिविका भागवत असे प्रशासनाने कारवाई करून दुकानातील लाखो रुपयांच्या मालाचे व साहित्याचे नुकसान केले. तसेच नगर परिषदेने चिकन विक्रेत्यांना कसल्याच प्रकारची जागेची व्यवस्था न करता कारवाई केल्यामूळे व्यवसाय करणाऱ्या पन्नास ते साठ व्यापाऱ्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामूळे मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भाजपाचे शहर उपाध्यक्ष आरेफ सय्यद यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

About The Author