वाङ्मय मंडळातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो- डॉ कमलाकर गव्हाणे

वाङ्मय मंडळातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो- डॉ कमलाकर गव्हाणे

उदगीर (एल.पी.उगीले) : वाङ्मय मंडळातून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळतो, कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे, कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणे, सूत्रसंचालनाची पद्धती समजावून घेणे, पाहुणे आल्यानंतर त्यांचे आदरातिथ्य करणे. अशा विविध गोष्टी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कळतात. त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. असे वक्तव्य महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील इंग्रजी विभागातील डॉ.कमलाकर गव्हाणे यांनी काढले.

ते शिवाजी महाविद्यालयातील इंग्रजी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे, कोषाध्यक्ष नामदेवराव चामले, उपप्राचार्य डॉ. आर एम मांजरे यांची होती. पुढे बोलताना गव्हाणे म्हणाले, इंग्रजी ही भाषा सर्व क्षेत्रांमध्ये महत्त्वाची आहे. सद्यस्थितीमध्ये इंग्रजी भाषेशिवाय तरणोपाय नाही .त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे. इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद करत असताना इंग्रजीचाच वापर करावा. त्यामुळे इतरांवर इंग्रजीचा प्रभाव वाढेल आणि इंग्रजी भाषा सोपी वाटेल, असेही गव्हाणे म्हणाले.
यावेळी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन व भित्तीपत्रकाचे प्रकाशन झाले. वाङ्मय मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष तेजश्री बिरादार ,सदस्य पल्लवी पटके ,पवार श्रद्धा, नागरगोजे प्रतीक्षा ,बेग उमेरुमन, मिरकले आदिनाथ ,उस्ताद अनस या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप अध्यक्षाच्या वतीने उपप्राचार्य डॉ.मांजरे आर एम यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.अरविंद नवले यांनी केले. .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रशांत माने यांनी तर आभार प्रा. सोनाली कांबळे यांनी मानले. यावेळी इंग्रजी विभागातील डॉ. किरण गुट्टे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!