कैलास पाटील सेनेच्या माध्यमातून प्रभावी कार्य करतील – संजय राठोड
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील संघटन कुशल नेतृत्व आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नूतन तालुकाप्रमुख कैलास पाटील हे शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात उत्कृष्ट कार्य करतील. असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी व्यक्त केला.
ते संजय राठोड आणि मित्र परिवाराच्या वतीने शिवसेनेचे नूतन तालुकाप्रमुख कैलास पाटील यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. कैलास पाटील यांच्या सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या आणि संघटन कुशल नेतृत्वाच्या बळावर निश्चितपणे उदगीर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभावशाली कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना कैलास पाटील यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठी आणि जिल्हाप्रमुख तसेच इतर मित्र मंडळांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी लावून, निश्चितपणे त्यांच्या विश्वासाला पात्र राहीन. आपल्या नेत्याला खाली मान घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य यापूर्वीही आपण केले नाही. आणि भविष्यातही ते शक्य नाही. असाही विश्वास कैलास पाटील यांनी याप्रसंगी बोलून दाखवला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
