आत्मनिर्भर भारत केंद्र अभियान सर्वसामान्यापर्यंत पोहचण्याची गरज – हर्षल विभांडिक यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारत केंद्र अभियान सर्वसामान्यापर्यंत पोहचण्याची गरज - हर्षल विभांडिक यांचे प्रतिपादन

लातूर (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्याचे काम केले जात आहे. दिड महिण्यामध्ये राज्यातील 15 हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून त्याला उभारी देण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून केले जात आहे. येत्या तीन महिण्यामध्ये ही संख्या लाखावर जाण्यासाठी आत्मरिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र अभियान सर्वसामान्यापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे प्रदेश संयोजक हर्षल विभांडिक यांनी केले.

यावेळी ते भाजपा युवा मोर्च्याच्यावतीने महाराष्ट्र विद्यालयामध्ये आयोजित आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे मराठवाडा संयोजक हर्षवर्धन कराड, भाजपा युवा मोर्च्याच्या प्रदेश सचिव प्रेरणाताई होणराव, दत्ता चेवले, गणेश गोमचाळे, आत्मनिर्भर भारतच्या मराठवाडा सहसंयोजक ललीता जाधव, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्च्या प्रदेश कार्यकारिणी रविशंकर केंद्रे, आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राचे संयोजक आकाश बजाज, सहसंयोजक राजेश पवार, अ‍ॅड.पंकज देशपांडे, महादेव पिटले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना हर्षल विभांडिक म्हणाले की, सात दिवसामध्ये एक दिवस केंद्र उभारणीसाठी द्यावा या माध्यमातून लाभार्थ्यांचा आकडा वाढला तर आपल्याच आत्मनिर्भर केंद्राच्या माध्यमातून लातूरचे नाव राज्यभरात जाईल. जितका वेळ आपण पक्ष आंदोलनासाठी देता तेवढाच वेळ केंद्रासाठी द्या. सध्या लातूरच्या केंद्रावर 250 लाभार्थी झालेल्या आहेत. परंतु यावर समाधान न मानता सहा प्रभारी असलेल्या या जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या अडीच हजाराच्या वर वाढेल यासाठी सर्वांनी सक्रिय प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश गोजमगुंडे यांनी केले तर आभार गणेश गोमचाळे यांनी मानले.

यावेळी या कार्यक्रमाला भाजपा युवा मोर्च्याचे शहर सरचिटणीस गणेश गोजमगुंडे, अमोल गित्ते, सागर घोडके, युवती विभाग प्रमुख पुनम पांचाळ, सोशल मिडीया संयोजक रंजित गवळी,उपाध्यक्ष शंभूराजे पवार, निखील गायकवाड, गजेंद्र बोकन, निरज गोजमगुंडे, ऋषिकेश पांचाळ, चिटणीस शैलेश बिराजदार,दुर्गेश चव्हाण, अजय कोटलवार, ओम धरणे, गोविंद सुर्यवंशी, युवा मोर्च्या मंडलाध्यक्ष रविशंकर लवटे, धनु आवस्कर, अ‍ॅड.किशोर शिंदे, अभिजीत मुनाळे, राजेश्री होणाळे, महादेव पवार, विकास डुरे-पाटील, आकाश जाधव, आकाश पिटले, धिरज भैरूमे, योगेश गंगणे, गौरव बिडवे, अभिनव भोसले, चैतन्य फिस्के, पृथ्विराज कुरे, यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

38 योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर बना
केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत तरूणांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न केंद्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेले आहेत. या आत्मनिर्भर भारतच्या राज्यातील पहिल्या64 केंद्राचे उद्धाटन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, युवा मोर्च्याचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे. योगायोग असा की लातूरचे सहा प्रभारी असून लातूरच्या आत्मनिर्भर केंद्राचे उद्घाटन भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्याहस्ते करण्यात आले. त्यामुळे लातूरच्या आत्मनिर्भर केंद्राच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा आकडा वाढण्यासाठी सर्व टिमने सक्रीय योगदान द्यावे. आणि 38 योजनांच्या माध्यमातून सर्वांनी स्वावलंबी बनावे , असे आवाहन आत्मनिर्भर भारतचे मराठवाडा संयोजक हर्षवर्धन कराड यांनी केले.

About The Author