सहकारी बोर्डाने जिल्हयात उत्कृष्ठ सहकार प्रशिक्षण कार्यक्रम राबवून राज्यात लातूर पॅटर्न कायम ठेवला
सहकारी बोर्डाचे चेअरमन विजयकुमार पाटील यांची माहिती.
लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा सहकारी बोर्ड मागच्या काही वर्षांत डबघाईला आले असताना राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या खंबीरपणे मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा सहकारी बोर्डाने गेल्या तीन वर्षात जिल्यात विवीध सहकारी प्रशिक्षण कार्यक्रम राबवून राज्यात लातूर जिल्हा सहकारी बोर्ड नफ्यात आणून सहकारात लातूर बोर्डाने नवा पॅटर्न तयार केला असून अनेक वर्षांपासून बंद असलेला सहकारी संस्थेसाठी डी सी एच कोर्स सहकारी बोर्डाने सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा सहकारी बोर्डा चे चेअरमन विजयकुमार पाटील यांनी यावेळी बोलताना दिली ते बुधवारी ३ मार्च रोजी जिल्हा सहकारी बोर्ड संघाच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
यावेळी प्रमूख अतिथी म्हणून जिल्हा सहकारी बोर्डाचे उपाध्यक्ष नारायण लोखंडे, संचालक गोरख लोखंडे, महादेव माळी, संचालिका सौ मीनाताई सूर्यवंशी, प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस हारिराम कुलकर्णी, प्रगती बिजोत्पादन सहकारी संस्थेचे राजू पांचाळ, सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी जे ठोंबरे, जिल्हा सहकारी विकास अधिकारी एस एस देशमुख उपस्थित होते.
पुढें बोलताना विजयकुमार पाटील म्हणाले की सहकारी बोर्डाचे कामकाज सुलभ व्हावे यासाठी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातुन जिल्हा बँकेने संगणक प्रिंटर सिस्टीम भेट दिली त्यामुळे आम्हीं जिल्यात अनेक ठिकाणीं प्रशिक्षण राबवू शकलो त्यामुळेच यावर्षी डी सी ए म कोर्स पोस्टाद्वारे सुरू करण्यात आला असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक मंडळाचे कामकाज सुरू असून अनेक वर्षानंतर हे बोर्ड यावर्षी नफ्यात आले आहे असे सांगून भविष्यात बोर्डाच्या माध्यमातुन सहकार तत्वावर अधिक कोर्स सुरु कर न्यात येणारं असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विवीध विषयांना मान्यता दिली पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा बँके च्या माध्यमातून सहकारी बोर्डाला संगणक सिस्टीम भेट दिली त्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
यावेळी आभार प्रदर्शन एस बी येळीकर यांनी मांडले
३१ व्या सर्वसाधारण सभेस kovid १९ च्या नियमाचे पालन करीत सुरक्षीत अंतर राखून सभा संपन झाली.