गाडवेवाडी – नागरसोगा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
वाहन चालवताना होतोय प्रचंड त्रास
लामजना (प्रशांत नेटके) : गाडवेवाडी – नागरसोगा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या वाढत असताना , रस्ताच्या दुरुस्ती साठी संबंधित विभागाला मुहूर्त कधी मिळेल , असा संतप्त सवाल प्रवाशांमधून वाहनचालकांतून व्यक्त होत आहे.
तपसे चिंचोली – तळणी – गाडवेवाडी – नागरसोगा – हा रस्ता औसा किल्लारी जाण्यासाठी अत्यंत सोयीचा असल्याने, त्यावरून जड वाहने व प्रवासी वाहनांची कायम वर्दळ असते.
सध्या उसाचा हंगाम सुरू असल्याने उसाचे ट्रक ट्रॅक्टर या सर्वांची कायमच वर्दळ असते. मात्र, हा रस्ता सध्या गाडवेवाडी ते नागरसोगा माळा पर्यंत लहान-मोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यावरून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे.
पावसाळा संपून अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाला मुहूर्त मिळालेला नाही.