गंगापूर चा तलाठी लयभारी शासनाच्या पगारी बरोबर..! अवैध मुरूम उपशाचे पैसे घेतो भारी भारी..!!
लातूर ( प्रतिनिधी ) : लातूर शहरालगत असलेल्या गंगापूर शिवारातून अवैध मुरुमाचा उपसा खुप मोठया प्रमाणात चालू आहे, परंतु त्या परिसरात काम करणारया महसूल विभागाच्या तलाठ्याला मात्र दिसून येत नाही, कदाचित पदाची व अवैध मार्गाने कमावलेल्या पैशाची मस्ती चढल्याने दिसत नसेल, लातूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार स्वप्नील पवार हे अत्यंत कर्तव्यदकठोर अधिकारी आहेत.
अवैध वाळू वाहतूकीवर लातूर जिल्हय़ाच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करत तब्बल 25 लाखांहून दंड वसूल करून अवैध वाळू वाहतूकीवर नियंत्रण आणले होते, अशा अनेक कारवाई ते करत आहेत, मात्र अवैध मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही , अवैध मुरुम उत्खनन करणारा व्यक्ति महसूल विभागातील अधिकारयाचा वसुली एजंट म्हणून काम करत असल्याचे बोलले जात आहे,सदरील व्यक्ती सर्व अवैध मुरुम उत्खनन व वाहतूक करणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन महसूल विभागातील अधिकारी व संबंधित तलाठी ला पुरवत असल्याची बोलले जात आहे ? मग हे खरे असेल तर कर्तव्यदक्ष तहसीलदार स्वप्नील पवार यांनी या संदर्भात अधिक लक्ष केंद्रीत करून अवैध मुरुम उत्खनन करणार्यांवर व संबंधित गंगापूर च्या तलाठी वर कारवाई करावी अशी लोकांची मागणी होत आहे.