सिध्दी शुगर येथे सर्वरोग निदान शिबीर संपन्न

सिध्दी शुगर येथे सर्वरोग निदान शिबीर संपन्न

अहमदपुर (गोविंद काळे) : तालूक्यातील सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि, महेशनगर, उजना येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, लातुर व प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी अंतर्गत ऊस तोड कामगारा साठी कारखाना साईटवर दि. ०४ मार्च रोजी आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचाराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी या सर्वरोग निदान शिबीराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री व सिध्दी शुगरचे आधारस्तंभ बाळासाहेब जाधव साहेब हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत सिध्दी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाशभैय्या जाधव साहेब, व्हाईस प्रेसिडेंट पी.जी.होनराव, वैद्यकिय अधिक्षक डॉ.दत्तात्रय बिराजदार, बालरोगतज्ञ डॉ.सुरजमल सिंहाते, अस्थिरोगतज्ञ डॉ.अमृत चिवडे, वैद्यकिय अधिकारी डॉ.बाळासाहेव बयास आदींची उपस्थिती होती.

सदरील शिबीरात कारखान्याचे व्यवस्थापकिय संचालक अविनाश जाधव साहेब यांनी शिबीर आयोजित केल्याबददल व सर्व वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचायांनी कोवीड १९ च्या मागील काळात व सद्यपरिस्थितीत २४ तास चांगले कार्य करत असल्याबददल सर्व डॉक्टर्स व स्टाफ चे आभार मानले. सदरील शिबीरामध्ये ऊस तोड कामगार, कर्मचारी, यांचे बी.पी., मधुमेह तपासी तसेच गरोदर महिला, कर्करोग, थायराईड, कावीळ, लिव्हर, किडणी, कोरोणा च्या इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी कारखाना परिसरातील ऊस तोड कामगारासह वडारवाडी, पेमा तांडा, सांगवी तांडा, राळगा, तुळशिराम तांडा, उजना, राळगा तांडा आदी गावातील २३८ जनांनी शिवीराचा लाभ घेतला. या शिबीरासाठी कारखान्यातील जनरल व फॅक्टरी मॅनेेजर बी.के.कावलगुडेकर, जनरल मॅनेजर ( केन ) पी.एल.मिटकर, जनरल मॅनेजर ( डिस्टीलरी ) एस.बी.शिंदे, चिफ अकौटंट एल.आर.पाटील , सल्लागार सोमवंशी. ऊस विकास अधिकारी वाय.आर.टाळे, परचेस ऑफिसर धनराज चव्हाण, इन्व्हारमेंट केमीस्ट दिलीपराव ताटे, प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना अंधोरी, प्राथमिक आरोग्य अधिकारी बाळासाहेब बयास यांनी तर आभार दराडे पी.व्ही यांनी मानले.

About The Author