रामकृष्ण पब्लिक स्कूल येथे लहान बालकांसाठी सुवर्णप्राशन संस्कार शिबिर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथे नुकतेच शालेय विद्यार्थी व लहान बालकासाठी सुवर्णप्राशन संस्कार शीबीर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन रामकृष्ण पब्लिक स्कूलचे संस्थापक अरविंद पत्की व धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. अविनाश जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.
हे शिबीर आयुष मंत्रालय ,नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज यांच्या वतीने उदगीर येथील नावाजलेली रामकृष्ण पब्लिक स्कूल येथे शिबिर घेण्यात आले .या शिबिरात रामकृष्ण पब्लिक स्कूल येथील 0 ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांना सुवर्णप्राशन, व संस्कार शिबीर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली . या शिबिरात एकूण 125 विद्यार्थ्यांना सुवर्णप्राशन औषधाचे ड्रॉप देऊन, संस्कार शिबीर घेण्यात आले.
या प्रसंगी धन्वंतरी मेडीकल कॉलेजचे डॉ.अविनाश जाधव बोलतांना म्हणाले की, दिनचर्यानुसार राहणी मानात कसे असावे?, जीवन शैलीजन्य अजार होऊ नये, यासाठी काय उपाय करावेत? याचे सखोल मार्गदर्शन केले.
शेवटी बोलतांना ते म्हणाले की, हर दिन हर घर आयुर्वेद या संकल्पनेनुसार दैंनदिन व्यवहार सर्व ठिकाणी सर्वांनी आयुर्वेदातील बहूमोल याचे आचरण करावे, असे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ.अविनाश जाधव, अमोल बिरादार, श्रुती मालुन जयकर ,हंमबर्ड स्वप्नाली , पटेल सिफा, रवोपे संचिता हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण पब्लिक स्कूल येथील शिक्षिका नागराणी कुलकर्णी, शेख परवीन ,सुनीता कंचे, स्वाती बिरादार ,ऐश्वर्या वकील , वर्षा गुट्टेवार, शेख हुरुणीसा ,सोनी नगरे तसेच या शाळेचे प्राचार्य वैजयंतीमाला हुंडेकर यांनी विशेष पारिश्रम घेतले.
