मातृभूमी महाविद्यालयाच्या फुटबॉल विद्यापीठ स्पर्धेत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : मातृभूमी महाविद्यालयाच्या फुटबॉल संघाचे विद्यापीठ स्पर्धेत यश मिळवल्या बद्दल फुटबॉलच्या विजेत्या संघाच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ब झोन फुटबॉलच्या स्पर्धा उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानात संपन्न झाल्या. ब झोन मध्ये अहमदपूर, शिरूर, उदगीर, देवणी, देगलूर, मुखेड, जळकोट व कंधार या तालुक्यातील सर्व कॉलेज चा समावेश आहे. उदगीर येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धेत मातृभूमी महाविद्यालयाच्या संघाने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. मातृभूमी प्रतिष्ठान शि.प्र.मं.चे अध्यक्ष सतीश उस्तुरे व महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी यांच्या हस्ते संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
खेळाडू प्रविण राठोड , विश्वजित कांबळे , रामप्रसाद मुंढे , कृष्णा चिद्रेवार,गायकवाड ,नरसिंग ,गायकवाड रितेश ,बाजगीरे गजेंद्र ,प्रथमेश राठोड , रोहन आरदवाड , खपर्ले संदिप ,सय्यद आफ्रोज , निलेश पाटील या विजेत्या संघातील खेळाडूंचे प्रा बिभीषण मद्देवाड ,प्रा रणजीत मोरे, प्रा उस्ताद सय्यद, प्रा धोंडीराम जोशी, ,प्रा रूपाली कुलकर्णी ,प्रा अश्विनी देशमुख, प्रा अन्वेष हिप्पळगावकर , प्रा आशा पवार , संतोष जोशी, नंदू बयास , आंबादास पोद्दार आदींनी अभिनंदन केले आहे.
