प्राचार्य महादेव गव्हाणे यांच्या हस्ते नीता मोरे सन्मानित
उदगीर (एल.पी.उगीले) : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा मराठवाडा साहित्य मंच लातूर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.यनिमित्त नीता मोरे यांचा राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालमेळावा समन्वयक, सत्रप्रमुख, संचालन, ग्रंथादिंडी शाळा संपर्क प्रमुख, पालखी व्यवस्था,साडी कवायत प्रमुख अश्या व्यवस्था व्यवस्थितरित्या पार पाडल्या.
सीमावर्ती भागातील कवी संमेलनात निमंत्रित कवी, तसेच “गुजगोष्टी “या कथासंग्रहाचे प्रकाशन. इत्यादी भरीव योगदानबद्दल सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी औशाचे आमदार अभिमन्यू पवार, लेखक माधव भांडारी, प्रवीण सरदेशमुख, उमेश सेलूकर, गुरुनाथ मगे, डॉ. अशोकराव कुकडे, डॉ. जोत्स्ना कुकडे, प्रदीप कुलकर्णी, सुनील वसमतकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.या बद्दल साहित्यप्रेमींनी अभिनंदन केले आहे.
