शिक्षण सहसंचालक डॉ.विठ्ठल मोरे उच्च शिक्षण विभाग,नांदेड यांची हावगीस्वामी महाविद्यालयास सदिच्छा भेट
उदगीर (एल.पी.उगीले) : शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण विभाग डॉ.विठ्ठल मोरे ,नांदेड यांनी नुकतेच उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, सदस्या डॉ.मनीषाताई पाटील – देशमुख, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.ए.ए.
काळगापुरे, कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत धनुरे उपस्थित होते.
याप्रसंगी सहसंचालक डॉ.विठ्ठल मोरे यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीच्या संदर्भात संवाद साधून मार्गदर्शन केले. प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण व सुविधा द्यायला हवे. नांदेडला सहसंचालक म्हणून येण्यापूर्वीही माझी महाविद्यालयास नेहमी सहकार्याची भूमिका राहीलेली होती आणि आजही राहील. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल, याकडे त्यांनी लक्ष द्यावे.महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमाला महाविद्यालयाकडून प्रतिसाद द्यावा व वेळेत अहवाल सादर करावे.असे सांगत महाविद्यालयाच्या कामकाजाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.
डॉ. मोरे सर आपण महाविद्यालयास सदिच्छा भेट दिलात या बद्दल मनस्वी आनंद झाला, असे संस्थेच्या सदस्या डॉ. मनीषाताई पाटील देशमुख म्हणल्या.शेवटी डॉ.ए.ए काळगापुरे यांनी सर्वांचे आभार मानले.
