शिवाजी महाविद्यालयाचा फुटबॉल संघ प्रथम

शिवाजी महाविद्यालयाचा फुटबॉल संघ प्रथम

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ब झोन फुटबॉलच्या स्पर्धा उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे कार्यकारी मंडळातील चामले नामदेवराव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा. डॉ आर एम मांजरे यांनी खेळाडूंना खेळाबरोबर अभ्यास तसेच आपल्या आरोग्यावर भर देण्यास सांगितले .स्पर्धा बाद पद्धतीनी खेळविल्या गेल्या. विभागातील महाविद्यालयाच्या टीमने सहभाग नोंदवला होता, त्यात उदगीर येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या संघामध्ये संघ नायक शेख यासेर, शेख रहेमत, शेख उमर, फैझान खान, सय्यद अफान, वाघमारे कार्तिक, शेख सोहेल, सोफियान, अंधारे ज्ञानेश्वर, शेख अजाण, कोठारे रितेश या खेळाडूंनी चांगल खेळाचे प्रदर्शन केले .
महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा डॉ एस व्ही जगताप, समन्व्यक प्रा. डॉ विष्णू पवार यांच्या हस्ते विजयी, उपविजयी, व तिसरा क्रमांक प्राप्त केलेल्या संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धे चे मुख्य पंच म्हणून राष्ट्रीय खेळाडू परवेज कादरी, संतोष वेरूळे, मुन्ना लोणीकर, यांनी केली .खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडा संचालक प्रा निहाल अहमद खान, प्रा. गजानन माने यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रबंधक बालाजी पाटील, भीम जाधव, ब्राम्हनणंद स्वामी, सतीश बापुरे, तुकाराम चौधरी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!