शेतकऱ्यांना आमदार बनसोडे यांनी दिली दिवाळी भेट, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे चेक वाटप
जळकोट (एल.पी.उगीले) : तालुक्यातील शेतक-यांचे सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीची मतदार संघाचे आ. संजय बनसोडे यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांना अश्वासित केले होते. यावेळी मतदार संघातील पिकांचे नुकसान झाले म्हणून आ.बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करुन मतदार संघातील शेतकऱ्यांना दिवाळी सणाच्या अगोदर सततच्या पावसाचे शासनाचे अनुदान द्यावे म्हणून पाठपुरावा केला. आज त्या अनुदानच्या धनादेशाचे वाटप आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथ किडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष मारोती पांडे, तहसीलदार सुरेखा स्वामी, माजी जि.प. सदस्य उस्मान मोमीन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सत्यवान पाटील, विठ्ठल चव्हाण, शिवानंद देशमुख, श्रीकृष्ण पाटील, चेअरमन अशोक डांगे, महेताब बेग, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मन्मथ बोधले, नगराध्यक्ष सौ.प्रभावती कांबळे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बंँकेचे मॅनेजर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.