मी सदैव शेतकऱ्या सोबत – आ. संजय बनसोडे

मी सदैव शेतकऱ्या सोबत - आ. संजय बनसोडे

दोन दिवसात थेट शेतक-यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याची सूचना

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील शेतक-यांचे सततच्या पावसामुळे शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीची मतदार संघाचे आ. संजय बनसोडे यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जावुन पाहणी केली, व शेतकऱ्यांना अश्वासित केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करुन मतदार संघातील शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देणार असा शब्द दिला होता.
दिवाळी सणाच्या अगोदर सततच्या पावसाचे अनुदान थेट बँक खात्यातुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सुचना यावेळी आ. संजय बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या असुन तहसील कार्यालयात शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे, तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, पं.स.चे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, कृषी अधिकारी संजय नाबदे, गटविकास अधिकारी महेश सुळे, श्रीमंत सोनाळे, प्रा.श्याम डावळे,शिवसेनेचे मुन्ना पांचाळ, प्रकाश हैबतपुरे, अंकुश कोनाळे, बालाजी पुरी,तसेच विविध बँक शाखेचे मॅनेजर व मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
उदगीर तालुक्यातील 99 गावच्या शेतकऱ्यांना सर्व नुकसानी बाबत अनुदानाची प्रक्रिया त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी एकूण 43 कोटी 97 लाख 56 हजार रुपयाचे वितरित करण्यात आले. त्यात गोगलगायमुळे नुकसान झालेले दहा गावातील 72 शेतकऱ्यांना 53 हेक्टर क्षेत्राला 720800 व अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या 43 गावातील 5183 हेक्टर बाधित क्षेत्र, 10396 शेतकऱ्यांना 7 कोटी 4 लाख 88 हजार 800 व सततच्या पावसामुळे 99 गावातील 36 हजार 222 शेतकऱ्यांना 26951.26 बाधित क्षेत्रास 36 कोटी 85 लाख 46 हजार 400 रुपयाचे धनादेश सर्व 29 बँकांना वितरित करण्यात आले. या सर्व बँकेमार्फत येत्या दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम जमा होईल, व दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळून जाईल. असे माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे व तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले.

About The Author