जळकोट येथील प्रशासकीय इमारतीरतीची आ.संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी

जळकोट येथील प्रशासकीय इमारतीरतीची आ.संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी

जळकोट (एल.पी.उगीले) : ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होवु नये. म्हणून एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालय असावेत, यासाठी माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी १४ कोटी ९९ लक्ष रुपये मंजूर केलेल्या जळकोट प्रशासकीय इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. सदर इमारतीचे काम हे अंतिम टप्प्यात असुन येत्या २६ जानेवारीला या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्याचा अपेक्षा आहे.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथ किडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन अगलावे, कॉंग्रेसचे तालुकाअध्यक्ष मारोती पांडे, माजी जि.प. सदस्य उस्मान मोमीन, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, नगराध्यक्ष सौ.प्रभावती कांबळे, विठ्ठल चव्हाण, खादरभाई लाटवाले, नायब तहसीलदार राजा खरात, कृषी अधिकारी आकाश पवार, शाखा अभियंता एस.पी. देशापांडे, संजय हासुळे पाटील , राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील, अतनुरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, गजानन दळवे, विनायक जाधव, श्रीकृष्ण पाटील, आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!