धन्वंतरी तर्फे पुष्य नक्षत्रावर 11,861 बालकांना मोफत सुवर्णप्राशन शिबिर संपन्न

धन्वंतरी तर्फे पुष्य नक्षत्रावर 11,861 बालकांना मोफत सुवर्णप्राशन शिबिर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटलच्या वतीने उदगीर व अहमदपूर तालुक्यातील 40 शाळांमध्ये जन्मापासून ते 16 वर्ष वयोगटाच्या लहान बालकांमध्ये शारीरिक,मानसिक व बौद्धिक विकासासाठी तथा त्वचेची कांती वाढविण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्ती संग्राम लढा यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हमारा आयुष-हमारा स्वास्थ्य,आरोग्य सर्वांसाठी तथा आयुर्वेदा फॉर न्यूट्रिशन या संकल्पनेनुसार हर घर-हर दिन आयुर्वेद या अभियान अंतर्गत मोफत सुवर्णप्राशन(बाल रसायन घृतपान)-एक आयुर्वेदिक लसीकरण हे शिबिर पुष्य नक्षत्र दिनी आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात एकूण 11,861(अकरा हजार आठशे एकसष्ट)बालकांना मोफत सुवर्णप्राशन देण्यात आले. प्रत्येक शाळेमध्ये महाविद्यालयातील डॉक्टरांनी तेथील विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना सुवर्णप्राशनचे महत्व विशद करताना असे सांगितले की, सुवर्णप्राशन केल्यामुळे बालकांच्या शरीरात इम्युन सेल्स व टी-सेल्स वाढतात,रोगप्रतिकारक्षमता वाढते,शरीरामध्ये कसलेही मेटाबाॅलिक बदल न होता त्याचा लहान मुलांच्या पोषणामध्ये लाभ होतो. असे सेंटर फॉर बायोमेडिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. ऋतू बदलातील होणाऱ्या रोगांपासून सुद्धा संरक्षण होते.

या शिबिरादरम्यान धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी संबंधित शाळांमधील विद्यार्थी,पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना पोषण आहार,योग व प्राणायामाचे निरोगी जीवनात महत्त्व,दिनचर्या-ऋतुचर्या या सोबतच अतिसार,बाल दमा,पौगंडावस्थेतील आजार,क्षयरोग,बाल मधुमेह,कळी उमलताना,लसीकरणाचे राष्ट्रीय आरोग्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नमूद करण्यात आलेल्या विविध आजारासंबंधी मार्गदर्शन केले.सदरील मोफत सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन प्राचार्य तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ.दत्तात्रय वि.पाटील,रुग्णालय समिती प्रमुख प्रा.डॉ.मंगेश मुंढे,सहप्रमुख प्रा.डॉ.रविकांत पाटील,बालरोग विभागप्रमुख समन्वयक प्रा.डाॅ.अस्मिता भद्रे,रुग्णालय उपाधिक्षक डॉ.उषा काळे,सहसमन्यक प्रा.डॉ.शिवकुमार होटुळकर यांनी केले होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ.बालाजी कट्टेवार,डॉ.पुष्पा गवळे,डॉ वैभव बिरादार,डॉ.अविनाश जाधव,डॉ.नामदेव बनसोडे,डॉ.अमोल पटणे,डॉ.प्रशांत बिरादार,डॉ.सचिन टाले,डॉ.चरणदास गाडेकर,डॉ.स्नेहलता पाटील, डॉ.प्राजक्ता जगताप,डॉ.राखी वरनाळे,डॉ.योगेश सुरनर,डॉ गुरुराज वरनाळे, डॉ.नम्रता कोरे,डॉ विष्णुकांत जाधव,डॉ.शिवकांता चेटलुरे,डॉ.रश्मी सुखदेवे,डॉ.भारती पटणे,डॉ.प्रिती रोडगे, डॉ अलका भंडारे,डॉ शैलजा मुळजकर, डॉ.विष्णुकांत मुंढे,डॉ.ओम चिट्टे आणि आंतरवासियता प्रशिक्षणार्थी तथा प्रथम ते चतुर्थ वर्ष बी.ए.एम.एस.चे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासोबतच संबंधित शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

About The Author