दयानंद कला महाविद्यालयात सत्रांत बैठक संपन्न

दयानंद कला महाविद्यालयात सत्रांत बैठक संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने शै. वर्ष 2022-2023 मधील सत्रांत बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीत विशेष प्राविण्य, पदोन्नती, नवनियुक्त प्राध्यापक, व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजन करण्यात आला. यात दयानंद कला महाविद्यालयाचे नवनिर्वाचीत उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, विद्यावाचस्पती डॉ. दूर्गा शर्मा व कनिष्ठ महाविद्यालयातील नवनियुक्त क.म.वि.शिक्षक श्री. मनोज गवरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. तसेच दयानंद कला महाविद्यालयात शै. वर्ष 2022-23 मध्ये पेट परीक्षा उत्तीर्ण, नविन प्रशासकीय कर्मचारी आदीचे या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत करण्यात आले. तसेच शै. वर्ष 2022-23 च्या सत्रांत बैठकीच्या निमित्ताने नॅक मुल्यांकनासंदर्भात सुट्टयानंतर नियमीत कामकाजाबाबत प्राचार्य साहेबांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड उपस्थित होते. सत्कारमुर्ती उपप्राचार्य डॉ प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक दिलीप नागरगोजे, डॉ. दूर्गा शर्मा, स्टाफ सचिव सुरेश क्षीरसागर, कार्यालयीन अधिक्षक श्री. रुपचंद कुरे इतर प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुरेश क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुधीर गाडवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.जिगाजी बुद्रुके, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. दिनेश जोशी, प्रा. शैलेश सुर्यवंशी, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. रत्नाकर केंद्रे, प्रा. अनिल भूरे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author