कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणार : माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुका व शहरातील कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असुन दररोज माझे कामगार बांधव विविध ठिकाणी कामावर जात असतात. शासनाच्या शेकडो लाभदायक योजना आहेत, त्या आपल्या दारांपर्यंत याव्यात. यासाठी मी शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे. कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ देवून त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणार असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र दक्ष कामगार संघटनेच्या सुचना फलकाचे अनावरन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी लातूचे सहाय्यक कामगार आयुक्त मंगेशजी झोले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्रा.श्याम डावळे, अहमद सरवर, जितेंद्र शिंदे, व्यंकटराव पाटील, फय्याज शेख, प्रदीप जोंधळे, विजय भालेराव, बसवराज ढोले आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी महाराष्ट्र शासन व कामगार विभागाच्या वतीने मध्यान्ह भोजन योजना असुन माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेला मंजुरी दिली होती. कामगार बांधवांच्या दुपारच्या मोफत जेवणाची सोय व्हावी, म्हणून गेल्या ६-७ महिन्यापूर्वी ही योजना आणली. या योजनेसाठी आपण पाठपुरावा करुन आपल्या दुपारच्या जेवणाची सोय केली आहे. या मध्यान्ह भोजनाचा लाभ सर्व कामगारांनी घ्यावा. या सोबतच जास्तीत जास्त कामगारांनी आपली अधिकृत नोंदणी करुन घ्यावी. असे आवाहन केले.
प्रत्येक गरीब माणूस मोठा झाला पाहिजे. प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे, म्हणून आपण शासनाच्या विविध योजना आपल्या दारापर्यंत घेवुन येत आहोत. यामध्ये एखाद्या कामगाराचा अपघात झाला तर त्यांच्या वारसाला ५ लाख रुपयाचा विमा शासनाच्या वतीने दिला जाणार आहे. त्यासाठी कामगाराची नोंदणी करणे आवाश्यक आहे. दुपारच्या जेवणासाठी कामगारांना वार्षिक नोंदणी ही नाममात्र शुल्क असुन आपण ज्या भागात राहतो, तेथील अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणुन नोंदणी करावी. अधिकृत कागदपत्रासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरातील कामगारांनी मुख्याधिकारी यांच्या कडे आपल्या नोंदणीसाठी प्रमाणपत्र घेवुन जावे. व त्यांच्याकडुन आपण कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येवून जनजागृती करुन त्याची रितसर नोंदणी करावी. असे आवाहन वेळोवेळी महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ करत असल्याचेही आ.बनसोडे यांनी सांगितले. यावेळी मध्यान्ह भोजन वाटप करणाऱ्या योजनेच्या गाड्यांचे आ. संजय बनसोडे यांचे हस्ते फित कापुन शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.बिभीषण मद्देवाड यांनी केले तर आभार संघटनेचे सचिव बबन कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नवनाथ वाघमारे, जिया हाशमी, भारत खोरीकर, अर्जुन सुर्यवंशी, मौसम चाऊस, उमाकांत शिंदे, गौस मोपेकर, विजय सुर्यवंशी, केशव कांबळे, नरसिंग गायकवाड, हरिश्चंद्र सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, ज्ञानोबा बनसोडे, नरसिंग कांबळे, तानाजी पांडेकर, सचिन सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.