त्वचाविकार केवळ बाह्य स्वरूपात नसतो त्याची कारणे शरीराच्या अंतर्गत असतात – डाॅ.सोनल कांडगीरे

त्वचाविकार केवळ बाह्य स्वरूपात नसतो त्याची कारणे शरीराच्या अंतर्गत असतात - डाॅ.सोनल कांडगीरे

उदगीर (एल.पी.उगीले) : त्वचाविकार केवळ बाह्य स्वरुपात नसतो त्याची कारणे अंतर्गत असतात .त्यामुळे नागरीकांनी आरोग्य सांभाळण्यासाठी नियमित तपासणी करावे,असे आवाहन व्यंकटेश स्किन केअर हाॅॅॅस्पीटलच्या त्वचा रोगतज्ञ डाॅ सोनल कांडगीरे यांनी केले.

त्या मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना आयोजीत मोफत त्वचाविकार, नेत्ररोग व मधुमेह तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.यावेळी मंचावर डाॅ.रामप्रसाद लखोटीया अध्यक्ष लायन्स नेत्र रुग्णालय,डॉ. प्रशांत नवटक्के (मधुर डायबिटीस सेंटर) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्या उषा कुलकर्णी या होत्या .यावेळी मंचावरून बोलताना रामप्रसाद लखोटीया यांनी डोळ्याचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजचे आहे. काचबिंदू, मोतीबिंदू या विषयी माहिती दिली.आपल्या पश्चात नेत्रदानाने आपण जग नव्याने पाहू शकतो.नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान होय.असे मत व्यक्त केले.

मधुमेहाविषयी सांगताना डॉ. प्रशांत नवटक्के म्हणाले की, भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढतच आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा आजार होऊ शकतो. यासाठी नियमित व्यायाम,संतुलित आहार महत्त्वाचा आहे. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, विकास नगर, राम नगर, नाईक नगर,अशोक नगर तसेच उदगीरातील नागरीकांची तपासणी व उपचार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.बिभीषण मद्देवाड यांनी केले.सुत्रसंचलन प्रा.अश्विनी देशमुख यांनी केले. आभार प्रा.धोंडीराम जोशी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष जोशी,प्रा. उस्ताद ,प्रा. रणजित मोरे,प्रा. रेखा रणक्षेत्रे , प्रा रूपाली कुलकर्णी,प्रा आशा पवार,उषा सताळकर, प्रा अन्वेष हिप्पळगावकर व रासयोच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.

About The Author