नगर परिषद उदगीर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ लातूर यांची प्लास्टिक बंदी अंतर्गत संयुक्त कार्यवाही
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने सिंगल युज (एकल वापर) प्लास्टिक जप्तीची कार्यवाही चालू करण्यात आली आहे. दि 20/10/2022 रोजी नगर परिषदेचे पथक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ लातूर यांचे पथक व ग्रामीण पोलीस स्टेशन व शहरी पोलीस स्टेशन यांच्या पथकाने संयुक्त कार्यवाही केलेली आहे.नांदेड बिदर रोड येथे चेक पोस्ट उभारून सदरील कार्यवाही करण्यात आली . या कार्यवाहिमध्ये एकूण 10 kg प्लास्टिक जप्त करण्यात येऊन 5000/- दंड आकारण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासन अधिसूचना पर्यावरण विभाग 2018 अन्वये महाराष्ट्र शासनाद्वारे प्लास्टिक व थर्मोकोल इ पासून तयार वस्तू यांचे उत्पादन, विक्री, वाहतूक , वापर यांचे नियमन करने करिता अधिसूचना दि. 23/06/2018 अन्वये संपूर्ण राज्यात बंदी लागू करण्यात आलेली आहे. सदरील अधिसूचनेचे उल्लंघन झाल्यास पाहिल्या वेळेस 5000/- दंड, दुसरे वेळेस 10000/-रू. व तिसरे वेळेस 25000 रू.दंड किंवा कारावास किंवा दोन्ही असे दंड आकारण्यात येईल. तरी याचे उल्लंघन कोणीही करून नये, असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद उदगीर यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
सदरील कार्यवाही मुख्याधिकारी शुभम क्यातमवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यवाहिमध्ये महाराष्ट्र प्रदूषण मंडळ लातूर यांचे अधिकारी आर.के. क्षीरसागर , नगर परिषद चे स्वच्छता अभियंता दर्शन बिराजदार, स्वच्छता निरीक्षक अमित सुतार, उमाकांत गंडारे, विनोद रंगवाळ, शेख सिकंदर ,तसेच मनोज बलांडे व अतिक्रमण विभागातील कर्मचारी , ग्रामीण पोलीस कर्मचारी व शहरी पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने कार्यवाही केली.