जुनी गंज येथील अंबाबाई मंदिरासमोरील सुलभ शौचालयाचे काम थांबवावे – काँग्रेसची मागणी
उदगीर( एल. पी.उगीले) : उदगीर येथील नगर परिषदेच्या वतीने जिजामाता व्यापारी संकुलात जुना गंज येथे अंबाबाई मंदिरासमोरा बांधण्यात येत असलेली मुतारी थांबविण्यात यावी. व त्याची दुसरीकडे पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटूरे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उदगीरचे शहर अध्यक्ष मंजूर खान पठाण,न.प.माजी सदस्य महेबूब शेख,लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास एकुर्गेकर,उदगीर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विपीन जाधव,उदगीर युवक काँग्रेस सरचिटणीस नागेश पटवारी,सद्दाम बागवान,महेश तोडकर उपस्थित होते.