प्रभाग क्रमांक 13 व 17 भागातील रोडवरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून द्यावे – प्रहार ची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : प्रभाग क्रमांक 13 मधील समता नगर मधील रोडवर व प्रभाग क्रमांक 17 मधील कॅप्टन चौक लालबहादूर शास्त्री शाळेच्या बाजूस शास्त्रीनगर भागातील रोडवरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याबाबत निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांना देण्यात आले.
निवेदनामध्ये प्रभाग क्रमांक 17 मधील श्रीकृष्ण कॉलनी येथील मुंढे यांच्या घरासमोरील रोडवर आणि प्रभाग क्रमांक 13 मधील समता नगर येथील भगीरथ वेअर हाऊसच्या मागे कोयले यांचे घर ते पोलीस सूर्यकांत यांच्या घरासमोर मुरूम टाकून देण्यात यावे, तसेच पाऊस पडला की समता नगर भागातील रस्त्यावर चिखल व पाणी साचत आहे.
लोकांना चालता सुद्धा येत नाही, यामुळे परिसरातील नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. व कॅप्टन चौक लालबहादूर शास्त्री शाळेच्या बाजूस शास्त्रीनगर भागात जाणाऱ्या रस्त्यावर पाईपलाईन साठी खोदण्यात आले असल्याने मोठा खड्डा पडला आहे. त्यामध्ये पाणी साचत आहे. तसेच शाळकरी मुलांना रस्ता खराब झालेला असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे .असे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले .यावेळी उदगीर प्रहार चे तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे , प्रहार तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे , शहर कार्याध्यक्ष – प्रेमकुमार तोगरे व पदाधिकारी उपस्थित होते .