विधीज्ञ पटवारी सक्रिय होताच बाळासाहेबांची शिवसेना लोकप्रियतेच्या शिखरावर !
उदगीर (एल. पी. उगिले) – उदगीर येथील ज्येष्ठविधीज्ञ तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे जुने सहकारी गुलाबराव उर्फ बापूराव पटवारी यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासाठी सक्रिय होताच लातूर जिल्ह्यामध्ये अनेक तरुणांनी या पक्षात प्रवेश करायला सुरुवात केली आहे.
परवाच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे सचिव संजयजी मोरे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठविधीज्ञ गुलाबराव पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळभाऊ माने यांच्या हस्ते अनेक तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश उदगीर उपजिल्हाप्रमुख विकास दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये देवणी तालुकाप्रमुख संदीप पेठे, विधिज्ञ पूजाताई कप्पीकेरे, विक्रम मुरलीधर आर्य, संतोष चौधरी, संतोष श्रीमंगले, नारायण श्रीमंगले, अतुल सूर्यवंशी, दत्ता श्रीमंगले, अमोल क्षीरसागर, दत्ता भोसले, अजय जामडकर, आसिफ शेख, गणपती श्रीमंगले, सुनील श्रीमंगले लाळीकर, वीरप्पा खेडे, सुरज श्रीमंगले, महेश जाधव, बालाजी बिजलवाडीकर, मल्हारी कांबळे, अविष्कार कांबळे, सुरज आर्य, देवाशीष चौधरी, मोहन मुरलीधर आर्य, अनिल शिंदे, संतोष खेडेकर, श्रीनिवास शेंडगे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांना जिल्हाप्रमुख गोपाळ भाऊ माने यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना विधिज्ञ पटवारी यांनी सांगितले की, शिवसेनेमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल. शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण लातूर जिल्ह्यांमधून प्रत्येक गावागावातून संघटन नव्याने उभा करण्याची गरज असून युवकांनी पुढे यावे, असे आवाहनही याप्रसंगी पटवारी यांनी केले.