पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे गोंदियाला, तर गडचिरोलीचे सोमय मुंडे लातूरला

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे गोंदियाला, तर गडचिरोलीचे सोमय मुंडे लातूरला

उदगीर (एल.पी.उगीले) : लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली येथे असलेले सोमय विनायक मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील 24 ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये 22 पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे. यामध्ये प्राधान्याने धनंजय कुलकर्णी यांची बदली रत्नागिरी येथे पोलीस अधीक्षक म्हणून तर औरंगाबाद ग्रामीण भागाचे अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांची बदली सिंधुदुर्गला, बसवराज तेली यांची बदली नागपूरहून पोलीस अधीक्षक सांगली येथे, शेख समीर असलम यांची बदली होऊन सातारा येथे, अंकित गोयल यांची बदली गडचिरोलीहून पुणे ग्रामीण साठी, शिरीष सरदेशपांडे यांची बदली नाशिकहून सोलापूर ग्रामीण साठी, तसेच राकेश ओला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरहून पोलीस अधीक्षक अहमदनगर , यम. राजकुमार यांची बदली लोहमार्ग नागपूर येथून पोलीस अधीक्षक जळगाव येथे झाली आहे.

श्रीमती रागसुधा आर. यांची बदली परभणी येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. संदीप सिंह गिल यांची बदली पोलीस अधीक्षक हिंगोली या ठिकाणी करण्यात आली आहे. श्रीकृष्ण कोकाटे हे मुंबईहून पोलीस अधीक्षक नांदेड येथे बदली झाली आहे. गडचिरोलीचे सोमय विनायक मुंडे हे लातूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. नागपूर शहरातील सारंग आवाड हे बुलढाणा पोलीस अधीक्षक म्हणून तर गौरव सिंह हे नाशिकहून पोलीस अधीक्षक म्हणून यवतमाळ येथे, तसेच संदीप घुगे हे मुंबईहून अकोला येथे पोलीस अधीक्षक म्हणून येत आहेत. रवींद्र सिंग परदेशी हे मुंबईहून चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून जात आहेत. नुरुल हसन हे नागपूर शहरांमधून पोलीस अधीक्षक म्हणून वर्धा येथे रुजू होत आहेत.

निखिल पिंगळे लातूर पोलीस अधीक्षक हे पोलीस अधीक्षक म्हणून गोंदिया याठिकाणी रुजू होत आहेत. निलोत्पल हे बृहन्मुंबई वरून गडचिरोलीला पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. संजय बारकुंड हे नाशिक शहराहून पोलीस अधीक्षक धुळे येथे रुजू होत आहेत. श्रीकांत परोपकारी हे पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथून पोलीस उपायुक्त ठाणे शहर येथे रुजू होत आहेत. सचिन अशोक पाटील हे नाशिक ग्रामीण येथून पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग औरंगाबाद या ठिकाणी रुजू होत आहेत. तसेच लक्ष्मीकांत पाटील हे पोलीस उपायुक्त ठाणे शहर हे पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर या ठिकाणी तर पराग शाम मनेर हे उपायुक्त विशेष सुरक्षा विभाग मुंबई या ठिकाणी रुजू होणार आहेत.
तसेच इतर आणखी एकोणीस आधिकारी यांच्याही बदल्या लवकरच केल्या जाणार असल्याची माहिती सदरील परिपत्रकात देण्यात आली आहे.

About The Author

error: Content is protected !!