दयानंद कला महाविद्यालयात दिपसंध्या कार्यक्रमाचे आयोजन

दयानंद कला महाविद्यालयात दिपसंध्या कार्यक्रमाचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने दिपसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कलर्स मराठी फेम सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात जिने दैदीप्यमान यश संपादन केले अशा कु.किशोरी मुर्के हिचे शास्त्रीय व सुगम गायनाचा कार्यक्रम होणार आहे तर सुप्रसिद्ध तबला वादक तेजस धुमाळ याचे स्वतंत्र तबला होणार आहे.त्याना हार्मोनियमची साथ प्रा. शरद पाडे करणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या हस्ते होणार आहे तर सरचिटणीस रमेश बियाणी व संयुक्त सचिव सुरेश जैन यांची उपस्थिती राहणार आहे.

हा कार्यक्रम दयानंद शिक्षण संस्था सभागृहामध्ये उद्या दिनांक २३/१०/२०२२ रविवार सायंकाळी 6:00 वाजता संपन्न होणार आहे.या विनामूल्य कार्यक्रमाचा लाभ लातूरकरांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ.प्रशांत मान्नीकर,उपप्राचार्य (कमवि) अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, संगीत विभागप्रमुख डॉ.देवेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीपान जगदाळे,प्रा.सोमनाथ पवार,कार्यालयीन अधीक्षक रुपचंद कुरे यांनी केले आहे

About The Author

error: Content is protected !!