शिवाजी महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय अविष्कार 23 संशोधन महोत्सवात यश

शिवाजी महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय अविष्कार 23 संशोधन महोत्सवात यश

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आयोजित शाहू महाविद्यालय लातूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय अविष्कार-23 संशोधन महोत्सवात शिवाजी महाविद्यालयास पदवी स्तरावर दोन द्वितीय व पदव्युत्तर स्तरावर एक द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. भौतिकशास्त्र विभाग व दुग्धशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनास द्वितीय पारितोषिक तर दुग्धशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर बी येडतकर व प्रा. वैराळे प्राणीशास्त्र विभाग या दोघांना शिक्षक गटातून प्रत्येकी प्रथम पारितोषिके मिळाले आहे .अविष्कार समितीचे प्रमुख डॉ. आर पी बिरादार व डॉ. डी बी मुळे यांनी विद्यार्थ्यांची संशोधने तपासून त्यांना मार्गदर्शन केले आहे. तरी या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, संस्थेचे सचिव ज्ञानदेव झोडगे , कोषाध्यक्ष चामले नामदेव , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव ,उपप्राचार्य डॉ.एस व्ही जगताप, उपप्राचार्य डॉ . आर एम मांजरे व सर्व कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author