माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांच्यातर्फे बागबंदे यांचा सत्कार व शुभेच्छा

माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांच्यातर्फे बागबंदे यांचा सत्कार व शुभेच्छा

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील युवा कार्यकर्ते कुणाल बागबंदे यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव पदी झाल्यानंतर, लातूर जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे प्रेरणास्थान असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कुणाल बागबंदे यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. आणि भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उदगीर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार नीटूरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव मामा बिरादार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुर्यशिला मोरे, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव उषाताई कांबळे, शहराध्यक्ष मंजूर भाई पठाण, माजी नगरसेवक शिवाजीराव भोसले, सरपंच ज्ञानेश्वर बिरादार, श्रीनिवास एकुरकेकर, फैयाज डांगे, महेश तोडकर, ईश्वर समगे, कपिल शेटकर यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी शुभेच्छा देताना आमदार अमित देशमुख यांनी स्पष्ट केले की, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून सर्व युवकांनी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. प्रगती करण्याची क्षमता आणि सर्वसामान्य माणसाला दिशा देणारी ताकद फक्त काँग्रेस पक्षाकडे आहे. ही बाब सामान्य जनतेला पटवून सांगावे. यामध्ये आपण कार्यक्षम ठरावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

About The Author

error: Content is protected !!