पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार सर्व अभियान प्रभावीपणे राबवणार – बाळासाहेब पाटोदे

पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार सर्व अभियान प्रभावीपणे राबवणार - बाळासाहेब पाटोदे

उदगीर (एल. पी. उगिले) : भारतीय जनता पक्षाच्यावतीने आणि भारतीय जनता युवा मोर्चा लातूर जिल्ह्याच्या वतीने अनेक उपक्रम आणि पक्ष संघटन बांधणीसाठी कार्यक्रम देण्यात येत आहेत. हे सर्व कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवून राज्यात सर्वप्रथम उदगीर तालुका युवा मोर्चा राहील. असा आत्मविश्वास युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उदगीर येथे युवा मोर्चाचे शहर व तालुका पदाधिकारी तसेच ग्रामीण भागातील युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक नुकती संपन्न झाली. या बैठकीसाठी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विधीज्ञ ज्ञानेश्वर चेवले, युवा मोर्चा जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सचिव प्रेरणा होनराव, प्रदेश सचिव तथा सहप्रभारी विधिज्ञ गणेश गोमचले, प्रदेश सचिव अमोल नागनाथ निडवदे इत्यादी मान्यवर या बैठकीसाठी उपस्थित होते.

पुढे बोलताना बाळासाहेब पाटोदे यांनी स्पष्ट केले की, पक्षश्रेष्ठींच्या वतीने धन्यवाद मोदीजी अभियान, युवा वॉरियर्स शाखा स्थापन करणे, तसेच नव मतदार नोंदणी आणि मन की बात या विषयावर सखोल चर्चा झाल्यानंतर या सर्व योजना आणि अभियान उदगीर तालुक्यातील युवा कार्यकर्ते तथा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी मोठ्या जिद्दीने अत्यंत प्रभावीपणे राबवतील. असा विश्वासही याप्रसंगी बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केला. या बैठकीसाठी उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!