तमलूर मदनुर -श्रीक्षेत्र कपिलधार पद यात्रेचे उदगीरात भव्य स्वागत

तमलूर मदनुर -श्रीक्षेत्र कपिलधार पद यात्रेचे उदगीरात भव्य स्वागत

उदगीर (एल.पी.उगीले) : श्री शिवानंद आश्रम तमलूर मदनुर ते श्रीक्षेत्र कपिलधार पदयात्रेचे उदगीर शहरात भव्य स्वागत करण्यात आले.

ष.ब्र. 108 शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कमलूर मदनुर ते श्रीक्षेत्र कपिलधार पदयात्रा दि. 27 ऑक्टोबर 2022 रोजी तमलूर येथून प्रारंभ झाली या पदयात्रेचे शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी उदगीर शहरात आगमन झाले यावेळी फटाक्याची आतषबाजी करून व पदयात्रिकरुंचे पुष्पहार अर्पण करून भव्य स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुशील कुमार जिवणे,सुरेश पटवारी,श्रीमंत बिरादार,पवण पाटिल,प्रकाश जिवणे ,पवण बिरादार यांनी स्वागत केले.

तर उदगीर शहरा लगत असलेल्या मलकापूर नवीन वसाहत एसटी कॉलनी येथे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज चौक या ठिकाणी मलकापूर वासियांच्या वतीने पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांचे महेश तोडकर यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले, तर राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेस शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. परमेश्वरी मंगल कार्यालय येथे महिला भजनी मंडळाच्या वतीने पदयात्रेकरूचे स्वागत करण्यात आले. महाआरती होऊन पदयात्रेतील शिवभक्तांना फराळाची व्यवस्था महालिंग मठपती,बस्वराज स्वामी, राहूल सुर्यवंशी व संतोष केंद्रे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. एसटी कॉलणी भजनी मंडळाच्या वतीने विजया मठपती,श्रीमती जयदेवी पोस्ते,मिना हलकुडे,रेखा स्वामि,सुनिता स्वामी,सुरेखा पाटिल,मंजू कप्ते,महादेवी बिरादार, राम मोतीपवळे,शिवकुमार स्वामी (साईराम),रमेश जाधव ,गोपाळ मालू, विजय तोडकर,संग्राम तोडकर,दिलिप गचाटे,किरण स्वामी,शिवकुमार स्वामी हैद्राबाद,प्रदिप देशमुख मुखेड,अशोक मोरखंडे,माधव मोरखंडे,विणायक धोंगडे,गुणवंत वाडकर यांच्या सह भक्तगण उपस्थित होते.

तमलूर मदनूर- कपिलधार पदयात्रा लोहारा,करडखेल, डिगोळ, बावलगाव ,चामरगा, नळेगाव, गांजुरवाडी, खरोळा सेलू, रेनापुर, कामखेडा, वाला, तत्तापूर, बर्दापूर, सुगाव ,राडी, बागलवाडी, आंबा साखर कारखाना अंबाजोगाई, केंद्रेवाडी ,आडस, कोळपिंपरी, किल्ले धारूर, तरणाळी, येवता विडा, कळसंबर आदी गावावरून मार्गक्रमण करत शिवनामाचा जप करीत ही पदयात्रा सोमवार दिनांक नोव्हेंबर रोजी संत शिरोमणी मनमत माऊली यांच्या सजीवन समाधीस्थळी कपिलधार येते या पदयात्रेचा समारोप होणार आहे.

About The Author