गुडसूर येथे डॉ. आंबेडकर भवन लोकार्पण व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

गुडसूर येथे डॉ. आंबेडकर भवन लोकार्पण व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील मोजे गुडसूर येथे विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनचा लोकार्पण सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा, असा संयुक्त कार्यक्रम गुडसूर येथील डॉ. बापूसाहेब काळदाते प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती गुडसूर येथील काँग्रेसचे नेते तथा विलास सहकारी साखर कारखाना युनिट 2 चे संचालक विनोबाजी पाटील गुडसुरकर यांनी दिली आहे.

दिनांक पाच नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बाबुराव मरलापल्ले तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना फुटाणे या राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुडसूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव मरलापल्ले हे राहणार आहेत.
या लोकार्पण सोहळ्यानंतर गुडसूर व हिप्परगा गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम केलेल्या आणि करत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करून गावाच्या विकासात योगदान व युवकांना प्रेरणा देण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी व मान्यवरांनी उपस्थित रहावे. असेही आवाहन संयोजन समितीच्या वतीने पद्मावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोमारे यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!