कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भोपणीकर आणि बागबंदे यांचा सत्कार

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भोपणीकर आणि बागबंदे यांचा सत्कार

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील युवा कार्यकर्ते कुणाल बागबंदे आणि देवणी तालुक्यातील युवक काँग्रेसचे नेते गजानन भोपनिकर या दोन्ही तरुणांचा समावेश महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर सचिव म्हणून करण्यात आला आहे. ही बाब लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. या दोन्ही तरुणांच्या हातून काँग्रेस पक्षाचे उत्कृष्ट कार्य होईल, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे नेते तथा उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच युवक कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांचा यथोचित गौरव आणि सत्कार करण्यात आला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भोपणीकर आणि बागबंदे यांचा सत्कार

याप्रसंगी मानकीचे सरपंच सतीश पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना गजानन भोपणीकर यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवू. यापूर्वी देवणी, निलंगा तालुक्यात युवकांची फळी उभारण्यासाठी भोपनीकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. आता प्रदेशची जबाबदारी आल्यामुळे महाराष्ट्रभर काम करावे लागणार आहे. तरीदेखील न डगमगता आपण आपल्या क्षमतेच्या मर्यादेपेक्षा जास्त काम करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर कुणाल बागबंद यांनी सांगितले की, आमचा हा सत्कार म्हणजे आम्हाला आणखी काम करण्याची प्रेरणा दिल्यासारखे आहे. घरच्यांनी गौरव करणे ही लाख मोलाची बाब असते, हे कौतुक आणि हा सत्कार आम्हाला सतत ऊर्जा देणारे ठरणार आहे. त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, असा विश्वास दाखवला.

About The Author

error: Content is protected !!