पोलिसांच्या सत्कारातून पोलिसांचे मनोबल वाढेल

पोलिसांच्या सत्कारातून पोलिसांचे मनोबल वाढेल

किनगांव येथील निरोप व स्वागत समारंभ सोहळ्यात उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले यांचे प्रतिपादन

किनगाव (गोविंद काळे) : कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या पोलिसांचा सत्कार करायला खूप मोठं मन लागतं या सत्कारातून निश्चितच पोलिसांचे मनोबल वाढेल असे प्रतिपादन अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलिस स्टेशन आयोजित निरोप व स्वागत समारंभ सोहळ्यात मंगळवार दि. २ मार्च रोजी सायं. मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले यांनी केले.

किनगांव पोलिस स्टेशन चे सपोनि खुब्बा चव्हाण यांची मुंबई येथे पोलिस निरीक्षक या पदावर पदोन्नती बदली झाल्याने निरोप आणि किनगांव पोलिस स्टेशन चा पदभार सपोनि शैलेश बंकवाड यांनी स्विकारल्याचे औचित्य साधून स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच किशोर (बापू) मुंढे होते तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लजिले होते.

यावेळी प्रस्ताविक पोहेकॉ विठ्ठल बोळंगे यांनी केले त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पोलिस निरीक्षक खुब्बा चव्हाण व सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश बंकवाड यांचा सऱ्हदयपूर्ण सत्कार किनगांव पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी, सर्व अमलदार, ग्रामपंचायतचे सरपंच किशोर मुंढे, पञकार संघाचे अध्यक्ष शेटीबा श्रृंगारे ,सचिव बालाजी गायकवाड, अफजल मोमीन, गोरख भुसाळे, प्रा बालाजी आचार्य, असलम शेख, जाकेर कुरेशी, व्यापारी असोशियशनचे अध्यक्ष हरी मामा सोनवणे, विष्णू मुंढे, गांव कामगार पोलिस पाटिल संघटना जिल्हाध्यक्ष संपतराव डोंगरे, ता अध्यक्ष संग्राम बरूरे, अंधोरी ग्रामस्थ शिवाजी पाटिल, लक्ष्मण सारोळे, नागनाथ माने, मनोज काडणगिरे, यलब्बा नलवाड, माजी सरपंच भाग्यश्री क्षिरसागर, राष्ट्रवादी च्या परभणी महिला जिल्हा सरचिटणीस सुरेखा कासले आदिसह राज्यमंत्री तथा आ. बाबासाहेब पाटिल यांच्या वतीने राजकुमार शिंदे पाटिल, लातूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष धनराज गिरी, शिवसेना उप ता प्रमुख गणेश पाचांळ, ग्रामीण विकास लोकसेवा संस्थेच्या वतीने एन डी राठोड, प्रा. भगवान आमलापुरे, बंजारा समाज परिवर्तन अभियानचे नाथराव राठोड, सरपंच उपसरपंच, पोलिस पाटिल यांनी सत्कार करून सम्यक शुभेच्छा दिल्या त्यानंतर धनराज गिरी, श्री. खुब्बा चव्हाण, श्री. शैलेश बंकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

या समारंभ प्रसंगी पुढे मार्गदर्शन करताना श्री लंजिले म्हणाले की, किनगांव पोलीस स्टेशन अंतर्गत तंटे तडजोडीने मिटविण्याचे काम होते असं न होता गुन्हे रेकार्डवर येऊ द्या गुन्हेगाराना शिक्षा झाली पाहिजे आणि सर्व सामान्याना न्याय मिळावा अपेक्षा जनतेची असते तपासाला योग्य दिशा देण्याची गरज आहे जनता प्रेम देते कर्तव्य दक्ष रहा, माणूसकी जिवंत ठेवा असाही सल्ला दिला अध्यक्षीय समारोप करताना किशोर मुंढे यांनी सर्वोत्तरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या सोहळ्याचे सुञ संचालन प्रा बालाजी आचार्य यांनी केले तर आभार पी एस आय गजानन अन्सापुरे यांनी मानले या उत्कृष्ठ समारंभ सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सपोनि शैलेश बंकवाड, पी एस आय गजानन अन्सापुरे, पोहेकॉ ज्ञानोबा मुरकुटे, विठ्ठल बोळंगे, व्यंकट महाके, चंदू गोखरे, महेबुब सय्यद, सुग्रीव देवळे, सिरसाठ, डोईजड, जोशी, मुंढे, हंगे, हमीद आदिसह अधिकारी व सर्व अमलदार यांनी परिश्रम घेतले. शारीरीक अंतर बाळगून किनगांव व परिसरातील नागरीक उपस्थीत होते.

About The Author