कव्हेकर दांम्पत्यांनी घेतली कोव्हिड-19 ची प्रतिबंधात्मक लस
लातूर (प्रतिनिधी) : भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जाऊन कोरोणाच्या पार्श्वभूमिवर कोव्हिड -19 ची प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी शासकीय सर्वोपचार रूग्णालयातील सेवेबद्दल कव्हेकरांनी समाधान व्यक्त केले. कोरोणाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर लसही निघाली असली तरी शासनाने पहिल्या टप्प्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर तसेच जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन शुक्रवारी दुपारी 4.00 वाजण्याच्या सुमारास कोव्हिड-19 ची प्रतिबंधात्मक लस घेतली. शासकीय सर्वोपचार रूग्णालयातील लस घेण्याची देण्याची प्रक्रिया चांगली असून लातूर शहर व परिसरातील जेष्ठ नागरिकांनी कोव्हिडच्या पार्श्वभूमिवर कोव्हिड-19 ची प्रतिबंधात्मक लस घेऊन कोरोणामुक्तीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही भाजपा नेते तथा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर व माजी जि. प. अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले.