दयानंद कला महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

दयानंद कला महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन औचित्य साधून सोमवार दि ०१ मार्च २०२१ रोजी कनिष्ठ महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धांचे आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी व पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रा. विलास कोमटवाड यांनी केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. तर स्पर्धेचे आयोजन डॉ संदिपान जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व विषद केले.

मराठी भाषेचे महत्व आणि कुसुमाग्रजांचे साहित्य या विषयावर कनिष्ठ वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. या स्पर्धेत मेघराज शेवाळे यांने प्रथम क्रमांक पटकावला तर प्राजक्ता चौधरी द्वितीय क्रमांक प्राप्त केला, अधिराज जगदाळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. गोपाल बाहेती आणि प्रा.दिनेश जोशी यांनी कार्य पाहिले.

वक्तृत्व स्पर्धांच्या अंती विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्ती पत्रकाचे विमोचन उपप्राचार्य अनिलकुमार माळी व पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मेघराज शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्पर्धेच्या आयोजक प्रा. शैलजा दामरे यांनी केले.

About The Author