खताच्या कारखान्यांना नवसंजीवनी देणार – चेअरमन आ.बाबासाहेब पाटील

खताच्या कारखान्यांना नवसंजीवनी देणार - चेअरमन आ.बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील बंद पडलेल्या खताच्या कारखान्यांना चालू करून योग्य दरात शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करून शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती, धवलक्रांती,आर्थिक क्रांती आणणार असल्याचे पणन महासंघ दि.महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन आ.बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

अहमदपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पणन महासंघाच्या दि.महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या चेअरमन पदी नियुक्ती झाल्याने भव्य सत्कार समारंभ व शिवभोजन थाळी चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी चेअरमन आ. बाबासाहेब पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती शिवानंद हेंगणे,नायब तहसीलदार मोरे,काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन,काँग्रेस आय अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सिराजुद्दीन जाहागीरदार, जि.प.सदस्य माधव जाधव, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख विलास पवार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहराध्यक्ष अजहर भाई बागवान,चंद्रकांत मद्दे शिवाजीराव खांडेकर, निवृत्तीराव कांबळे, प्रशांत भोसले,अ‍ॅड भारतभूषण क्षिरसागर,बाळासाहेब पाटील आंबेगावकर,अ‍ॅड सांब शेटकर,गोपीनाथ जोंधळे,दयानंद पाटील, अभय मिरकले,सतीश नवटक्के,आशिष तोगरे, अजहर सय्यद,फिरोज शेख,अतिश खुरेशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना चेअरमन आ.बाबासाहेब पाटील म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या वतीने जळगाव, औरंगाबाद,नगर आदी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य दरात खत पुरवठा करण्यासाठी कारखाने उभे करण्यात आले होते परंतु या कारखान्याला घरघर लागली असल्याने त्याला नवसंजीवनी देऊन शेतकऱ्यांना भगीरथ,युरिया हा खत शासनाच्या दराप्रमाणे देणार आहोत तालुक्यात शेती सिंचन क्षेत्रखाली आणण्यासाठी अकरा कोटी चे बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती धवलक्रांती हरितक्रांती होणार आहे. रस्ते,वीज,पाणी,मार्केटिंग ची व्यवस्था करून जिल्ह्यात टमाट्याचा व्यापार खूप मोठा आहे आपले तमाटे रेल्वेने दिल्लीत पोहोंचवण्यासाठी व्यवस्था करावयाची आहे.दूध प्रकल्पामधून दूध,दही तूप बटर याची विक्री वाढली की शेतकऱ्याच्या दूध व्यवसायाला चांगले दिवस येतील,अहमदपूरातील मार्केट यार्डात आलेल्या बांधवांना शिवभोजन ही महा विकास आघाडीची पाच रुपयाला भोजन योजना अत्यंत महत्वाची आहे असेही चेअरमन आ. बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे म्हणाले की बाबासाहेब पाटील हातात माती घेतली तरी त्याचं सोनं करतात ते ज्या ज्या क्षेत्रात गेले त्या त्या ठिकाणी योजनेला लागलेली घरघर त्यांनी काढून टाकून त्या व्यवस्थेलाही पुनर्जीवित केले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवभोजन थाळीचा उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीने भव्य सत्कार केला.आडत व्यापारी, हमाल संघटना, महिला संघटना यांच्या वतीने ही आ पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मारोती बुद्रुक पाटील व संभाजी चोपणे यांनी केले तर आभार विठ्ठलराव ढेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांनी प्रयत्न केले.

About The Author