माजी मंत्री एडवोकेट भाई किशनराव देशमुख यांचे दुःखद निधन

माजी मंत्री एडवोकेट भाई किशनराव देशमुख यांचे दुःखद निधन

अहमदपूर (प्रतिनिधि) : अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे सक्रिय नेते तथा माजी मंत्री एडवोकेट भाई किशनराव नानासाहेब देशमुख यांचे दिनांक 27 रोजी पहाटे तीनच्या सुमारास वृद्धापकाळाने वयाच्या 95 व्या वर्षी लातूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान दुखद निधन झाले. त्यांच्यावर सत्तावीस रोजी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या मूळ गावी नांदुरा खुर्द ता.अहमदपूर च्या शेतामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.

यावेळी झालेल्या शोक सभेत नगरपरिषदेच्या वतीने माजी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थकुमार सूर्यवंशी ,पत्रकार संघाच्या वतीने राम तत्तापुरे, डॉक्टर सेलच्या वतीने डॉक्टर अशोक सांगवीकर ,प्राध्यापक संघटनेच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर भूषण जरगुलवार, लोकायत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव एडवोकेट भाई पी डी कदम ,शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने एडवोकेट भाई उदय गवारे, विचार विकास मंडळ च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट भाई किशनराव बेंडकुळे, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे, भाजपाचे प्रदेशाचे प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील आणि अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी माजी मंत्री तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई किशनराव देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी मार्गदर्शनपर भाषणे झाली.

यावेळी मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या शोक संदेशाचे वाचन करण्यात आले. भाई किशनराव देशमुख हे महाराष्ट्रातील एक लढवय्ये व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये बी ए एल एल बी चे शिक्षण पूर्ण करून ते वकिली व्यवसायाकडे वळले. त्यांचा सुरुवातीपासूनचा पिंड शेतकरी कामगार पक्षाची जुळला होता. ते महाराष्ट्राला दिशा देणारे महात्मा गांधी महाविद्यालय याचे ते अर्थात विचार विकास मंडळाचे ते संस्थापक सचिव म्हणून कार्यरत होते. त्यानी लोकायत शिक्षण संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा लढा यात ते सक्रिय सहभागी होते. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील मन्याड खोऱ्याचा वाघ म्हणून त्यांना त्यावेळी संबोधले जायचे ,अहमदपूर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या उजाड माळरानावर वसलेल्या बालाघाट शेतकरी सहकारी साखर कारखान्याची मूरतमेढ त्यांनी रोवली होती. यासह अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचे अनमोल असे कार्य होते .महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ते सक्रिय होते. विवेक वाहिनीचे ते महाराष्ट्राचे प्रमुख होते. खास करून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकहितवादी चळवळीमध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. त्यांच्या पश्चात पत्नी विमलाबाई देशमुख, एक मुलगा आबासाहेब देशमुख, नातू भैय्यासाहेब देशमुख, तीन मुली, सून ,नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाबद्दल सर्व सरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author