हरिश्चंद्र आरदवाड यांचे दुखद निधन

हरिश्चंद्र आरदवाड यांचे दुखद निधन

अहमदपूर ( प्रतिनिधि) : तालुक्यातील वंजारवाडी येथील प्रगतिशील शेतकरी हरिचंद्र इराप्पा आरदवाड यांचे दि.28 रोज शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने लातूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करताना दुखद निधन झाले. त्यांच्यावर दिनांक 28 रोज शुक्रवारी दुपारी एक वाजता वंजारवाडी तालुका अहमदपूर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून कॉर्पोरेट क्लब विमा प्रतिनिधी दिलीप आरदवाड यांचे ते वडील होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!