महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा

महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारताचे पहिले उपपंतप्रधान,लोहपुरुष स्व.वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ. अनिल मुंडे हे होते तर, डॉ. सतीश ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार प्रशांत डोंगळीकर यांनी मानले. यावेळी अजय मुरमुरे, चंद्रकांत शिंपी आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!