शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन

शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वतंत्र चळवळीने व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व सर्व स्तरावरील जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी या दृष्टीने त्यांचा जन्मदिवस हा “राष्ट्रीय एकता दौड” म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने सदरील एकता दौडचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांच्या अध्येक्षतेखाली दौड चे आयोजन करण्यात आले. उदगीर शहर पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी, उदगीर ग्रामीण पोलीसचे कर्मचारी व अधिकारी, विद्या वर्धिनी हायसकूल चे मुख्याध्यापक रामभाऊ हाडोळे व विद्यार्थी तसेच शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.सर्वांना राष्ट्रीय एकता टिकून राखण्याची शपथ देण्यात आली.शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांनी दौड ला हिरवा झंडा दाखवून सुरुवात केली.या प्रसंगी पोलीस निरीक्षक गोरख दिवे, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, क्रीडा संचालक नेहाल खान, गजानन माने व कर्मचारी उपस्तित होते. कार्यकर्माची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

About The Author