निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष समितीचा लढा – माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : आपल्या भागात निवृत कर्मचाऱ्यांची संख्या ही लाखोच्या वर असून आपले संपूर्ण आयुष्य विविध शासकीय कार्यालयात खर्च करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळावी म्हणून इ पी एस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण देशभरात विविध आंदोलने करण्यात आले. मात्र त्यांना यश आले नाही. या सर्व वयोवृद्ध कर्मचाऱ्यांचे दुःख मला माहित आहे, म्हणून भविष्यात त्यांच्यासाठी मी विधानभवनात त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. मागील अनेक वर्षापासुन संघर्ष समितीचा लढा चालु असुन आजतागायत त्यांचे पेन्शनचे काम झाले नाही. ही गंभीर बाब असुन
निवृत्त कर्मचा-यांसाठी हक्कासाठी संघर्ष समितीचा लढा असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते ई पी एस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती शाखा उदगीरच्या वतीने आयोजीत मराठवाडा प्रदेश मेळाव्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर इपीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय सल्लागार पी. एन. पाटील, पश्चिम भारतचे सचिव सुभाष पोखरकर, महिला आघाडीचे अध्यक्ष शोभाताई भारत, पश्चिम भारत संघटक सरोजा नारखेडे, महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष ए.व्ही. आंबेकर, महाराष्ट्र संघटक बी.आर. पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष दादाराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष समीर शेख, उदगीर येथील संघटनेचे पदाधिकारी उमाकांत देशमुख, सूर्यकांत नादरगे, बी.एच. बिरादार, रमेश पेद्दावाड, व्यंकट जिनेवाड, बापूसाहेब कज्जेवाड, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी केले.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी,
ज्या खात्याच्या मंत्री आहे त्यांनीही आपले काम जबाबदारीने केले पाहिजे. म्हणून भविष्यात कामगार मंत्री सुध्दा कामगारांचा प्रतिनिधी असावा. अशी भावना व्यक्त करुन
मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण कष्टकरी कामगारांसाठी मतदार संघातील ३ हजार लोकांना मध्यन्ह भोजनाची व्यवस्था केली. आपल्या मागण्यासाठी मी स्वतः केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे पाठपुरावा करणार असुन पुढील काळात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधानभवनात आपला प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कर्नाटकातील गुलबर्गा येथे कामगारांसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रूग्णालय उभारले असुन त्याच धर्तीवर आपल्यासाठी काही करता आले तर नक्की करणार आहे.
याप्रसंगी तुकाराम शिंदे, बाचा तोगरीकर, ए. आर. स्वामी, रमेश जिवणे, प्रभाकर देशमुख, आर. एस. बिरादार, कोटगाळे, संदीप देशमुख, अजय शेटकार, एल.व्ही. मोतेवाड, आदी उपस्थित होते.
यावेळी मराठवाड्यातून आलेले ईपीएस उदगीर, अहमदपूर, लातूर, औसा, निलंगा व सीमा भागातूनही पेन्शनधारक उपस्थित होते.