वाढवणा पाटी येथे महिला प्रवाशांना निवारा व मुतारीची सुविधा नाही महिला व मुली प्रवाशांची होतेय कुचंबना
हुकूमत शेख (वाढवणा बु) : वाढवणा पासुन अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी नांदेड बिदर राज्य मार्ग क्रमांक 249 या रस्त्यावर अनेक चार चाकी वाहने,ट्रक, ट्रॅकटर, अनेक लांब पल्ल्याच्या बस याच मार्गांवरून धावतात.परिसरातील चोहीकडील प्रवाशांना याच ठिकाणी येउन पुढील प्रवास करावा लागतो. मात्र या ठिकाणी 20 वर्षा पासुन निवारा व लघु शंकेची सोय नसल्याने महिलांची कुचबंना होत आहे. असे असून देखील संबंधित स्थानिक प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहेm.
उदगीर आगारात बस गाड्या कमी झाल्यामुळे ग्रामीण व खेडे गावात बस बंदच आहेत. मात्र जीवनशैली व सगे संबधी, शिक्षणासाठी, खरेदी करण्यासाठी शहराकडे प्रवास ही नित्याचीच बाब आहे, म्हणून वाढवणा बु, वाढवणा खुर्द, बेळसांगवी, लाळी, लाळी बु, येवरी, मंगळुर, सोनवळा, डांगेवाडी, डाऊळ, हिप्परगा, गुडसूर, खेर्डा, किनी यल्लादेवी या गावातील प्रवाशांना चाकूर,लातुर उदगीर,कमालनगर,भालकी, बिदर,हाळी, शिरूर, अहमदपूर, लोहा, नांदेड, पुणे, मुंबई,या बसने प्रवास करावयाचा असेल तर प्रथम वाढवणा पाटीला येउन तासनतास बसची वाट बघत ताटकळत थांबावे लागते, व पुढील प्रवास करावा लागतो.
मात्र येथे महिलांना व प्रवाशांना बसण्यासाठी निवांऱ्याची सोय नाही. महिला व मुलींना लघु शंका करिता कसलीच सोय नसल्याने महिला मुलींना त्रास होत असुन त्यांची कूचबांना होत आहे. वाढवना पाटीवर दररोज हजारो प्रवासी ये जा करीत असतात, मात्र येथे निवारा व मुतारीचा आभावामुळे महिला व मुलींची कुचबांना होत असल्याची चर्चा महिला वर्गातून होत आहे. लवकरात लवकर संबंधित प्रशासनाने निवारा व मुतारीची सोय करण्याची मागणी महिला व महाविद्यालयीन, शाळकरी मुली प्रवाशातून होताना दिसत आहे.