मातोश्री च्या आशीर्वादाने नवीन ऊर्जा घेऊन काम करणार – कैलास पाटील

मातोश्री च्या आशीर्वादाने नवीन ऊर्जा घेऊन काम करणार - कैलास पाटील

उदगीर (एल. पी. उगिले) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्ष संघटनेच्या उदगीर तालुकाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर, नूतन तालुका प्रमुख कैलास पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अंकुश कोनाळे, व्यंकट साबने, मुन्ना पांचाळ, बालाजी पुरी, प्रकाश हैबतपुरे, गोविंद कोंपले, शरद सारे, रोहित पाटील, संजय मठपती, अरुण बिरादार या सहकाऱ्यासह मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे नेते तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच ओम राजे या मान्यवरांची सदिच्छा भेट घेऊन मार्गदर्शन घेतले.
मान्यवरांचे आशीर्वाद आणि जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांच्या सहकार्याने उदगीर तालुक्यात निश्चितपणे शिवसेनेचे वेगळे वर्चस्व आणि अस्तित्व निर्माण करून दाखवता येईल. असा विश्वासही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना कैलास पाटील यांनी स्पष्ट केले की, येणाऱ्या काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष आघाडीचा धर्म पाळत उदगीर तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण करून दाखवेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

error: Content is protected !!