अंकिता ढगे साहित्यगंध पुरस्काराने तर जयमाला काळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अंकिता ढगे साहित्यगंध पुरस्काराने तर जयमाला काळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले) : मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर आयोजित साहित्यगंध दीपोत्सव प्रकाशन समारंभ प्रसंगी दि. ३/११/२०२२ रोजी भालचंद्र ब्लडबॅंक सभागृह लातूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात जि. प. प्रा. शा. सय्यदपूर ता.देवणी येथील विद्यार्थीप्रिय , उपक्रमशील आदर्श शिक्षिका जयमाला भानुदास काळे यांना मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यापनासोबतच जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या म्हणून जयमाला काळे या विविध सामाजिक उपक्रमातही सहभागी असतात. याच कार्यक्रमात बालव्याख्याती , वादविवाद पटू म्हणून प्रसिद्ध झालेली अंकिता प्रदीप ढगे यांना साहित्यगंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समाजातील वाईट रूढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा समूळ नष्ट झाल्या पाहिजेत. महामानवांचे विचार घरघरात पोचायला हवेत यासाठी अंकिता ढगे नेहमीच प्रयत्नशील असते. यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सकाळ पासून चाललेल्या या कार्यक्रमात दोपोत्सव २०२२ सोबतच विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सकाळ सत्रात प्रकाशन व सत्कार सोहळा घेतला गेला. दुपार सत्रात निमंत्रित कवींचे राज्यस्तरीय कवी संमेलन घेण्यात आले.

About The Author