ज्वारी महागल्याने तव्यावरची भाकरी गायब
हुकूमत शेख (वाढवणा.बु) : वाढवणा व वाढवणा परिसरातील खेडे पाड्यात शेतकरी शेतमजूर कामगारांना तसेच ग्रामीण भागातील महिलांना ज्वारीची भाकरी, वरण सोबत चटणी ताक, दही काही नाही मिळाल्यास कांदा भाकरी तरी चवीनुसार खाणार. मात्र सध्या शेतकरी नगदी पिका कडे वळला असुन ऊस नाहीतर सोयाबीनची लागवड करत असल्यामुळे पशुना देखील चारा नाही, कडबा नाही. शेतीची अनेक कामे पशु ऐवजी ट्रॅक्टर ने नागंरणी, पेरणी, फवारणी, रास सर्व काही यंत्राने करीत असुन मजुराच्या हाताला मिळावे तसें काम नसल्याने पैशाची चन चन भासत आहे.
शेतकरी हायब्रीड ज्वारीची लागवड बंद केल्यामुळे दररोज घरात लागणारी तव्यावरची भाकरी गायब झाल्याची चर्चा चालु असुन ज्वारी बुडाल्यात जमा झाली आहे. अगोदर मल्ली, हायब्रीड, पिवळी, अशा अनेक प्रकारच्या ज्वारी शेतकरी लागवड करीत होते. मात्र आता शेतकरी फक्त सोयाबीन व उसाची लागवड करीत असल्यामुळे ज्वारीचे भाव गगणाला भिडले असुन हायब्रीड ज्वारी 34 रुपये प्रति किलो विक्री होत आहे. जुने दिवस येतील का? कांदा भाकर, चटणी, खाराची फोड खाऊन तांब्याभर पाणी पिले, तर हाता पायात शक्ती व ऊर्जा राहत होती.
गहू तांदुळ असुन ते खाऊ वाटतं नसल्याने शेतकऱ्यांनी आतातरी माणसासाठी व पशुच्या चारा, कडब्या साठी शेतात ज्वारी पिकांची लागवड करण्याची चर्चा होत आहे.