कव्हा येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करू – ना.गिरीषजी महाजन
एज्युकेशन हब म्हणून लातूरची ओळख राज्यात झालेली आहे. लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरात येतात. राज्यभरासह जळगाव, धुळे येथील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे लातूरच्या शैक्षणिक विकासासाठी मदत करू. कव्हा येथील विभागीय क्रीडा सकूंल व जिल्हा क्रीडा संकुलासाठी मोठा निधी लागणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये 100 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीतून कव्हा येथील विभागीय क्रीडा संकूलाचे काम दोन वर्षात पूर्ण करू असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.गिरीष महाजन यांनी केले.
यावेळी ते मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी आयोजित कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, राहुल केंद्रे, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अजित गोपछडे, वीरशैव समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबासाहेब कोरे, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, पतंजलि योग समितीचे विष्णूजी भूतडा, जग्गनाथराव पाटील, बाबासाहेब देशमुख,भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, विश्वजीत पाटील कव्हेकर,जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.